Posts

कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस वेग

Image
कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस वेग प्रथमच विना खांबाचा मंडप, ६ डिसेंबर पासून कृषी प्रदर्शनास प्रारंभ.. कराड, दि. 30 - शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दरवर्षी भरविण्यात येणारे यशवंत कृषी प्रदर्शन येत्या ६ डिसेंबर पासून सुरू होत आहे. कृषी प्रदर्शनाचे यंदा १९ वे वर्ष असून या  प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगाने सुरू आहे. प्रथमच विना खांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे.  शासन कृषी विभागाच्या सर्वोतपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभत आहे. जनावरांच्या बाजार तळावर प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जात आहे. पाच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे. यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जात आहे. हा मंडप पिलरलेस डोममध्ये वॉटरप्रुफ असणार आहे. त्यामध्ये ४०० स्टॉल, पशू पक्षांचे स्वतंत्र दालन आहे. आरोग्य विभाग व नवनवीन तंत्रज्ञान दाखवणारे स्टॉल असतील. संपूर्ण मंडपात हवा खेळती राहणार आहे. शेतकऱ्यांना समोर ठेवून प्रदर्शन भरवले जाणार ...

झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावा;आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निर्देश...

Image
कराड : शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठकीत चर्चा करताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले. झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावा;आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निर्देश... कराड दि. 29 (प्रतिनिधी) - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरुप समजावून घेतले. तसेच मतदारसंघातील विविध नागरी समस्या तातडीने सोडविण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना आ. डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी प्रशासनाला दिले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वत:चे पक्के घर मिळविणे हा या नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे येत्या ५ वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहता, त्याला स्वत:चे हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ...

नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसलेंना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची अलोट गर्दी.

Image
कराड : नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी केलेली अलोट गर्दी. नूतन आमदार डॉ. अतुलबाबा भोसलेंना शुभेच्छा देण्यासाठी लोकांची अलोट गर्दी. कराड, दि.29 (प्रतिनिधी) - कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विजयानंतर पहिल्यांदाच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज कृष्णा कॅम्पसमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठया मताधिक्याने विजय मिळवला. विजयानंतर लोकांनी मतदारसंघात मोठ्या उत्साहात डॉ. अतुलबाबा भोसले यांचे स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली.  यावेळी बोलताना आ. डॉ. भोसले म्हणाले, कराड दक्षिणच्या लोकांनी मला भरभरून मते दिली. मला मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे.  याप्रसंगी माजी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, ...

नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन

Image
  नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन मुंबई दि.24 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपा - महायुतीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे निवडणुकीतील यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. भोसले यांचे मुंबईत अभिनंदन केले.  कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. या मतदारसंघात आत्तापर्यंत केवळ तीनच लोकप्रतिनिधींनी प्रतिनिधित्व केले असून, हे तिघेही लोकप्रतिनिधी काँग्रेसचे मातब्बर नेते राहिले आहेत. यापैकी गेल्या १० वर्षांपासून या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा या निवडणुकीत भाजपा - महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी ३९,३५५ मतांनी पराभव करत देदीप्यमान विजय संपादन केला. या ऐतिहासिक विजयात कराड दक्षिणमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविण्यात यशस्वी झालेल्या डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावर राज्यभरातू...

मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण

Image
  मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार; आ. पृथ्वीराज चव्हाण कराड, दि.23 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, मतदारांनी आपला कौल दिला आहे. कराड दक्षिणच्या मतदारांचा निर्णय शिरोधार्थ आहे. माझ्या सहकार्यांनी सर्व शक्तीनुसार निवडणुकीत काम केले. त्या सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद. मी कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या सेवेकरिता कायम समर्पित राहणार आहे.  या निवडणुकीत अतुल भोसले विजयी झालेत त्यांचे अभिनंदन, ते कराडच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व कराडच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करतील त्या कामी त्यांना माझे सहकार्य असेल.  राज्यात श्री. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे, त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ते राज्याच्या विकासाकरिता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील हि अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा  ज्या प्र...

कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल

Image
  कराड शहरात उद्या वाहतूक मार्गात मोठा बदल दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन तर उत्तरची मतमोजणी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे होणार कराड, दि. २२ (प्रतिनिधी) - कराड दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शनिवारी सकाळी 6 वाजता सुरू होत आहे. त्यामुळे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजे पर्यत शहरातील वाहतुक मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.  कराड दक्षिणची रत्नागिरी गोडाऊन येथे मतमोजणी असल्याने विजय दिवस चौक येथुन भेदा चौक बाजुकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना (एस.टी. बस वगळून) प्रवेश बंद करणेत आला असून, सदरची वाहने विजय दिवस चौक येथुन दत्त चौक, पोपटभाई पेट्रोल पंप मार्गे कोल्हापुर नाका बाजुकडे जातील. तसेच एस.टी. बस ही विजय दिवस चौक येथुन टी पॉईन्ट मार्गे एस.टी. स्टॅन्ड येथे व त्याच मार्गे परत बाहेर येतील. कार्वेनाका बाजुकडुन भेदा चौकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना गेट नं. ४ येथुन भेदा चौक बाजुकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे, सदरची वाहने गेट नं.४ येथुन बैलबाजार रोड, मलकापुर, हायवे रोड मार्गे कराड शहरात जातील. पोपटभाई पेट्रोल पंप येथुन भेदा चौक...

कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर...

Image
  कार्वे : येथील जाहीर सभेत बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण, समोर उपस्थित जनसमुदाय कराड दक्षिण मधून पृथ्वीराज बाबांनाच निवडून द्या;माजी आ. रामहरी रूपनवर... कराड, दि. १८ (प्रतिनिधी) : मतदारांचे दुःख व त्यांच्या विकासाच्या मागणीवर टिक करून काम करतो, तो लोकप्रतिनिधी हवा. पृथ्वीराजबाबा कोण व काय आहेत. हे जाणून घ्यायचे तर १९८०च्या दशकात अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संगणकाचा शोध लावला. त्यांनी संगणकामध्ये इंग्रजीशिवाय दुसरी भाषा येवू शकत नाही, असा दावा केला. परंतु पृथ्वीराजबाबांनी संगणकामध्ये देव नागरी भाषा आणून क्रांती केली. आणि असा बुद्धिमान प्रतिनिधी कराड दक्षिणचा आहे. हे भाग्य जपण्यासाठी कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही. आणि कामाच्या माणसाला निवडून आणल्याशिवाय राहत नाही. असे सांगून पृथ्वीराजबाबा निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष होतील. अशावेळी सरकारच्या तिजोरीतून खाली पडलेला ढिगारा कराड दक्षिणमध्ये सरायचा नाही. त्यासाठी विकास निधीची काळजी कशाला करताय. २८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबा...