विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही : डॉ. अतुल भोसले
कासारशिरंबे : येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले. विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही : डॉ. अतुल भोसले कासारशिरंबेतील जाहीर प्रचार सभेला मतदारांचा उदंड प्रतिसाद वाठार दि. 9 (वार्ताहर) गेल्या दहा वर्षात विरोधकांनी या भागातील एकाही युवकाला काम दिले नाही. कराडच्या एम.आय.डी.सी.मध्ये ते नवीन उद्योग आणून रोजगार उपलब्ध करु शकले नाहीत. गेली २ पिढ्या सत्तेत असूनही रोजगार निर्मिती करू न शकणारे विरोधक आपल्या भावी पिढीचे काय भले करणार, असा सवाल भाजपा-महायुतीचे कराड दक्षिणमधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केला. कासारशिरंबे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धोंडीराम पाटील होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच श्री. उमेश पवार, उपसरपंच संतोषराव यादव, सुदन मोहिते, माजी सरपंच बाबुराव यादव, कृष्णा बँकेचे संचालक संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक मिलींद पाटणकर, तानाजी यादव, ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील, संजय यादव, बनकरराव पवार, बाबुराव माने, एकनाथ गायकवाड, राजाराम माने, भानुदास कचरे आदी म...