Posts

कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण...

Image
कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण... कराड दि.30-दि कराड अर्बन को-ऑप. बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा येथील वीटस् सत्यजित या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेने सन २०२३-२४ मध्ये रू.५१०० कोटी व्यवसायपूर्ती आणि नेट एन.पी.ए. शून्य टक्के या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने सदर संचालक सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, माजी ज्येष्ठ संचालक प्रा. विद्याधर गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेच्या सेवकांच्या हस्ते ५१०० कोटींचा उल्लेख असलेला केक कापण्यात आला. बँकेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्बन बझार व डॉ.द.शि. एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयश्री गुरव यांचा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बँकेच्या सन २०२४-२०२९ याकाल...

पुणे बेंगलोर महामार्गावर गोवा बनावटीचा अवैद्य मद्य साठा जप्त...

Image
कराड -पुणे बेंगलोर महामार्गावर गोवा बनावटीचा अवैद्य मद्य साठा जप्त... कराड दि.28-पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवडे गावच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मध्ये साठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कराड कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.  मिळालेल्या माहितीनुसार,  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुर्वे, विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. वैभव वैदय  राज्य उत्पादन शुल्क सातारा अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, कराड या कार्यक्षेत्रात दि. 27/04/2024 रोजी शिरवडे ता. कराड या गावच्या हद्दितून जाणाऱ्या जिल्हा मार्गावर लोकसभा 2024 च्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी करत असताना अवैद्य मद्याची वाहतुक करणारा एक संशयीत आयशर टेरा 16× PE CAB&TIPP कंपनीचा Dumper (HGV) क्र. MH-07-C-5971 सहाचाकी वाहन निदर्शनास आले वरुन सदर वाहनाची झडती घेतली असता त्या मध्ये गोवा राज्य विक्री करीता असलेला विदेशी मद्याचे एकूण 400 बॉक्स म्हणजेच 750 मिली क्षमतेच्या 4800 सि...

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची विंगमध्ये प्रचारसभा...

Image
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांची शनिवारी विंगमध्ये प्रचारसभा... कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा होणार शुभारंभ... कराड, दि.26 : सातारा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ विंग (ता. कराड) येथे शनिवारी (ता. २७) सायंकाळी ६ वाजता प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे संबोधित करणार आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवार दि. २७ एप्रिल रोजी विंग येथे सायंकाळी ६ वाजता चावडी चौकात हनुमान मंदिरासमोरील पटांगण येथे आयोजित केला आहे. सभेला सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यां...

भाजप सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत मोठा विकास;छ. उदयनराजे भोसले...

Image
भाजप सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत मोठा विकास;छ. उदयनराजे भोसले... कराड दि.22-: काँग्रेस पक्षाकडे अनेक वर्षे सत्ता असताना जेवढा विकास करता आला नाही, तेवढा भाजप सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांनी केले. महायुतीचे उमेदवार छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदयनराजे बोलत होते, यावेळी व्यासपीठावर कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, धोंडिराम जाधव, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, दत्तात्रय देसाई, दयानंद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, विजय जगताप, संग्राम बर्गे, संपतराव थोरात, बाळासाहेब निक...

कराड तालुक्यात ड्राय डे दिवशी चोरट्या दारू विक्रीवर पोलिसांचा छापा...

Image
विंग येथे ड्रायडे दिवशी 13 लाखाहून अधिक किमतीची विदेशी दारु जप्त; ४ इसमांवर कारवाई... कराड दि.14-शिंदेवाडी विंग ता. कराड येथील हॉटेल रॉयल लँडस्केप याठिकाणी आज ड्राय डे दिवशीच सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने छापा टाकून 13 लाखाहून अधिक किमतीचा दारू साठा जप्त करून चौघांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल २०२४ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांचे जयंती निमित्त सातारा जिल्हयामध्ये दारु विक्रिस बंदी (ड्रायडे) असल्याने अशी विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांच्या कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांनी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे कारवाई करण्याकरीता अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आज स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विंग ता. कराड येथील ह...

कराड शहर डी.बी. पथकाची मोठी कारवाई सापळा रचुन 1.905 किलो गांजा जप्न; एक आरोपी अटकेत...

Image
लोकसभा निवडणुक आचारसंहिता काळात कराड शहर डी.बी. पथकाची मोठी कारवाई सापळा रचुन 1.905 किलो गांजा जप्न; एक आरोपी अटकेत... कराड दि.12-सार्वजनिक लोकसभा निवडणुक काळात समीर शेख पोलीस अधीक्षक व आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर यांनी आगामी लोकसभा निवडणुक काळात कराड शहर पोलीस ठाणे हदीतील बेकायदेशिर धंदयावर बारकाईने लक्ष ठेवुण छापा कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होतो.व रिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पतंग पाटील व पथक हे कराड शहरातील बेकायदेशिर दारु विक्री व वाहतुक, अमंली पदार्थ विक्री व वाहतुक यासारख्या बेकायदेशिर धंदयावर छापा सत्र सुरु केले होते. यापुर्वी कराड शहरात अमंलीपदार्थ विरोधी तीन कारवाया करण्यात आल्या होत्या तसेच सार्वजनिक लोकसभा निवडणुक काळात सदरचे बेकायदेशिर धंदेवाले हे पुन्हा तोंड वर काढयाची शक्यता असल्याचे लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक अधिकारी पतंग पाटील व पथकास सदरबाबत गोपनिय माहिती काढुन छापा कारवाई करण्य...

दोन वर्ष तडीपार असलेला सराईत आरोपीस कराड शहर डी. बी. पथकाने केले अटक...

Image
दोन वर्ष तडीपार असलेला सराईत आरोपीस कराड शहर डी. बी. पथकाने केली अटक... कराड दि. 10-तीन महिन्यापूर्वी कराड शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या पालकर वाड्यातील साहिल मुजावर यास सातारा सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र तरीही तो शहरात वास्तव्यात असल्याची माहिती मिळताच कराड शहर डी बी पथकाकडून त्यास जेरबंद करण्यात आले आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर रा.121. पालकरवाडा मंगळवार पेठ, कराड व त्याचा साथिदारास पोलीस अधीक्षक यांनी 11 जानेवारी 2024 रोजी पासून दोन वर्षासाठी सातारा तसेच सांगली जिल्हयातील काही तालुक्यातुन हद्दपार केले होते. मात्र तरी देखील हा सराईत हद्दपार गुन्हेगार साहील आलम मुजावर याने पोलीस अधीक्षक यांचे आदेशाचे उल्लंघन करुन पालकरवाडा मंगळवार पेठ येथे छुप्या स्वरुपात वावरत होता. दरम्यान ही गोपनीय माहिती कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक के. एन. पाटील यांना मिळाली होती. त्याबाबत त्यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप निरिक्षक पतंग पाटील यांना माहिती ...