येवती - म्हासोली बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’...
येवती - म्हासोली बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पाला उपमुख्यमंत्र्यांचा ‘ग्रीन सिग्नल’... डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; ४००० एकर क्षेत्र पूर्णत: ओलीताखाली येणार... कराड, दि 1: येवती - म्हासोली मध्यम प्रकल्पातून कराड दक्षिणमधील गावांसाठी वितरित केले जाणारे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरित करावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात होती. भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी हा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला असता, त्यांनी या महत्वाकांक्षी बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पासाठी ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. या बंदिस्त पाईपलाईन प्रकल्पामुळे ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या परिसरातील गावांमधील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध असून, सुमारे ४००० एकरहून जास्त क्षेत्र पूर्णत: ओलीताखाली येणार आहे... पुढे वाचा टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ साली येवती – म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणातून डाव्या ...