स्वकेंद्रित वृत्तीमुळे व संवेदनशीलतेच्या अभावामुळे समाजातील जटिल प्रश्न कुटुंबापर्यंत पोचण्यास वेळ लागणार नाही: रो.मोहन पालेशा...
स्वकेंद्रित वृत्तीमुळे व संवेदनशीलतेच्या अभावामुळे समाजातील जटिल प्रश्न कुटुंबापर्यंत पोचण्यास वेळ लागणार नाही: रो.मोहन पालेशा... रोटरी क्लब ऑफ कराडचा पदग्रहण सोहळा... कराड, दि.9: सध्या माणूस हा स्वकेंद्री बनत चालला असून मी, माझी बायको व माझे कुटुंब अशी त्याची वृत्ती झाली आहे. स्वकेंद्रीत वृत्तीमुळे समाजातील प्रश्न कधी आपल्या कुटुंबापर्यत येऊन पोचतील, हे कळणारही नाही, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्याख्याते व प्रशिक्षक रो.मोहन पालेशा यांनी व्यक्त केले. येथील दि कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी हॉलमध्ये रोटरी क्लब ऑफ कराड व रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभात 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ कराडचे नूतन प्रेसिडेंट रो.बद्रीनाथ धस्के व नूतन सेक्रेटरी शिवराज माने यांचा पदग्रहण झाला. तर रोट्रॅक्ट क्लब ऑफ कराड सिटीच्या नूतन प्रेसिडेंट धिरज निकम व नूतन सेक्रेटरी प्रशांत माने यांचा पदग्रहण झाला. यावेळी मानद सदस्य तहसीलदार विजय पवार व दिलीपभाऊ चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभु...