छ. शिवाजी महाराज स्टेडियमचे शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई–भूमिपूजन
छ. शिवाजी महाराज स्टेडियमचे शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई – भूमिपूजन वाखाण रोड रस्त्याच्या कामासही होणार प्रारंभ; एकूण १४६.५० कोटींचा निधी कराड, ता. १० : कराडकराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून ९६.५० कोटींचा; तर वाखाण रोड ते कोरेगाव – कार्वे रस्त्यासाठी ५० कोटींचा विकासनिधी मंजूर झाला आहे. या निधीतून साकारण्यात येणाऱ्या या दोन्ही विकास प्रकल्पांचे ई – भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ११) सायंकाळी ४ वाजता करण्यात येणार आहे. कराडमधील सौ. वेणुताई चव्हाण स्मारकात आयोजित या ई-भूमिपूजन सोहळ्यासाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले प्रमुख उपस्थित राहणार आहेत. कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी अनेक काळापासून कराड तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून होत होती. अशावेळी डॉ. अतुल भोसले यांनी स्टेडियमवर आयोजित कृष्णा कृषी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र...