Posts

कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी- ना. शंभूराज देसाई...

Image
  कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी- ना. शंभूराज देसाई... मुंबई, दि. ३० : कराड विमानतळाचे विस्तारीकरण करून सर्व सुविधांनी युक्त विमानतळ करायचे आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीनीचे संपादन करून विमानतळ विकास कंपनीकडे जमीनीचा ताबा द्यावा. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध असून कालबद्ध कार्यक्रम राबवून कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. मंत्रालयातील समिती कक्षात कराड विमानतळ विस्तारीकराबाबत बैठकीचे आयोजन उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अपर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, प्रदीप पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सहभागी झाले होते.  मंत्री श्री. देसाई म्हणाले की, विमानतळ विस्तारीकरणासाठी वारूंजी येथील जमीन जवळ आहे. या जमिनीच्या संपादनासाठी खातेदार शेतकऱ्यांची संमती घ्यावी. यासंदर्भात स्थानिक लोकप्रत...

कराड विमानतळा नजीकचा वारुंजी येथील बहुचर्चित टॉवर प्रशासनाने उतरवला...

Image
  कराड विमानतळा नजीकचा वारुंजी येथील बहुचर्चित टॉवर प्रशासनाने उतरवला... कराड दि.28-(प्रतिनिधी) वारुंजी येथील विमानतळाच्या लगत असणाऱ्या बहुचर्चित टॉवरची उंची कमी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर प्रांत अधिकारी अतुल मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कंपनीला याबाबत सूचना दिल्याने अखेर त्या टॉवरची उंची कमी करण्यात आली आहे. वारुंजी येथे विमानतळ नजीक इंडस मोबाईलचा टॉवर उभा केला आहे. सदर टॉवर विमानतळ नजीक असल्याने त्यांनी विमानतळ प्राधिकरणाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक असतानाही, विमानतळ प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित टॉवर उभा केला होता. विमानतळ प्राधिकरणाने यापूर्वी विमानतळा परिसरातील उंचीच्या बांधकामाबद्दल तसेच टॉवर बद्दल सूचित केले होते. तरीही नियमांचे उल्लंघन करून हा टॉवर उभा करण्यात आला होता. याबाबत प्राधिकरणाने प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित टॉवर पाडण्याच्या आदेश जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच दिले होते. मात्र त्यानंतर झालेल्या अंतर्गत हालचालीमुळे जिल्हा प्रशासनाने नुकतेच नवे आदेश जारी केले होते. दरम्यान याबाबत जिल्हाधिकारी ...

कराड अर्बन बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न;सभासदांना १०% लाभांश जाहीर...

Image
कराड अर्बन बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न;सभासदांना १०% लाभांश जाहीर... कराड, दि.२८-कराड अर्बन बँकेची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जुलै रोजी कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि सर्व संचालक तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व सदस्यांसह सभासदांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा रू.५००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय रू.५१८६ कोर्टीवर पोहोचविला आहे. यामध्ये रू.३२६१ कोटींच्या ठेवी तर रू.१९२४ कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला एकूण रु.३७.११ कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु.२४.१२ कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सदृढता कायम राखली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले. बँकेने मागील वर्षीप्रमाणे वसुलीच्या कामकाजामध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करत जुन्या आणि न...

कराड दक्षिणमधील तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर...

Image
कराड दक्षिणमधील तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी ७५ लाखांचा निधी मंजूर... खा. उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांच्या पाठपुराव्याला यश... कराड, ता. २६ : कराड दक्षिणमधील विविध गावांमधील ‘ब’ वर्ग दर्जाच्या देवस्थान परिसरातील तीर्थक्षेत्र विकासकामांना ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सातारा लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन आदेश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने नुकताच जारी करण्यात आला आहे. कराड दक्षिणमधील विविध गावांमध्ये सुप्रसिद्ध मंदिरे असून, या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, या तीर्थस्थळांच्या विकास होणे गरजेचे आहे. यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी मंजूर व्हावा, या मागणीसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व डॉ. अतुल भोसले यांचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरु होता. याप्रश्नी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ना. गिरीश महाजन यांना पत्रव्यवहार कर...

कराड अर्बनला रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी;डॉ. सुभाष एरम...

Image
कराड अर्बनला रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी;डॉ. सुभाष एरम... कराड दि.26-दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडची १०७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२८ जुलै रोजी पंकज मल्टीपर्पज हॉल, कराड येथे आयोजित केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली. कराड अर्बन बँकेस रिझर्व्ह बँकेकडून आजच मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळाली असून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येलाच मागील सर्वसाधारण सभेची आश्वासन पूर्ती केल्याचा आनंद होत असल्याचे सांगत रविवार दि.२८ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. पंकज मल्टीपर्पज हॉल, हॉटेल पंकजचे मागे, कोल्हापूर नाक्याजवळ, कराड येथे आयोजलेल्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांनी उपस्थिती नोंदविण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सर्व सभासदांना केले आहे. सदरच्या सभेची नोटीस सर्व सभासदांना यापूर्वी त्यांच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहे. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व संचालक उपस्थित होते.

डॉ. अतुल भोसले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे ६.३८ कोटींच्या निधीची मागणी...

Image
कराडच्या पाणीपुरवठ्यासाठी डॉ. अतुल भोसले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे ६.३८ कोटींच्या निधीची मागणी... ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीच्या सूचना... कराड, दि.18 : कराडचा पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी कोयना नदी पात्रातील पाईपलाईनची दुरुस्ती, तसेच जुन्या जॅकवेलचे काम तातडीने करण्याची गरज आहे. या दुरुस्ती कामांसाठी ६.३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, अशी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. कराडकरांची गैरसोय दूर करण्यासाठी ना. फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत, याबाबत प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.  कोयना नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे पाईपलाईनमध्ये बिघाड होऊन कराडचा पाणीपुरवठा रविवार (ता. १४) पासून खंडीत झाला आहे. त्यामुळे गेले ४ दिवस कराडवासीयांना गंभीर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले कंबर कसून मैदानात उतरले आहे. नगरपालिकेच्या पंपिंग स्टे...

काकांनी सहकारात दिलेली योगदान कधीही न विसरता येणारे;आ. भाई जयंत पाटील....;;

Image
विलासकाकांच्या जाण्याने एका युगाचा अस्त झाला;पृथ्वीराज चव्हाण... कराड, दि. 14 (प्रतिनिधी) - विलासकाकांची संघटन शक्ती जबरदस्त होती. जिल्हा बँक त्यांनी नावारूपाला आणून विकासाचा पाया घातला. काकांकडे एक विचारांचे नैतिक अधिष्ठान होते. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक खंबीर व धाडसी निर्णय घेतले. काकांना त्यांच्या स्वातंत्र्यसेनानी वडिलांकडून मिळालेली शिकवण आणि काँग्रेसची विचारधारा यामुळे ते कोणत्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत. अशा वैचारिक अधिष्ठान असलेल्या काकांच्या जाण्याने एका युगाचा अस्त झाला, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. येथील कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात  माजी मंत्री लोकनेते स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी माजी खासदा...